त्रापानी
त्रापानी : प्राचीन द्रेपनम. इटलीच्या सिसिली बेटावरील त्रापानी प्रांताची राजधानी. लोकसंख्या ७०,०८२ (१९७१). हे वायव्य सिसिलीमध्ये पालेर्मोच्या पश्चिमेस ७४ किमी., भूमध्य समुद्रकिनाऱ्यावर वसले आहे. जुने शहर समुद्राकडील लहानशा द्वीपकल्पावर वसले आहे, तर आधुनिक शहर सान ज्यूल्यानॉ पर्वत पायथ्याच्या मैदानापर्यंत पसरले आहे.